शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील संवाद

​ठाणे जिल्ह्याचे श्रद्धास्थान: महामार्गावरील खर्डी गावच्या श्री सोनाई सीताई देवीचा यात्रात्सव: ( १४ एप्रिल ते अक्षय तृतीया १९  एप्रिल पर्यंत ) 

इमेज
  ​ ठाणे जिल्ह्याचे श्रद्धास्थान: महामार्गावरील खर्डी गावच्या श्री सोनाई सीताई देवीचा अद्भूत( १४ एप्रिल ते अक्षय तृतीया १९  एप्रिल पर्यंत )  यात्रात्सव:                        संकलन - प्रा.संजय फाकटकर         ​ठाणे जिल्ह्यातील मुंबई-नाशिक नॅशनल हायवेवर ( क्र.३ ) वसलेले खर्डी गाव सध्या भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. हजारो भाविकांची नितांत श्रद्धा असलेले आणि ऐतिहासिक वारसा जपणारे श्री सोनाई सीताई देवीचे मंदिर भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. ​रेल्वे स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटरवर हे मंदिर असून ​मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करताना खर्डी हे महत्त्वाचे ठिकाण लागते. खर्डी रेल्वे स्थानकापासून सुमारे दो किलोमीटर अंतरावर देवीचे हे भव्य मंदिर आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिरात दरवर्षी हजारो भक्त देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात.   ​शिरोळ ते खर्डी: देवीच्या आगमनाचा इतिहास: ​सुमारे १८५ वर्षांपूर्वी देवीचे मूळ स्थान शिरोळ येथील गोपाळपाड्यावर होते. खर्डी येथील भिका ...

दत्तात्रय बेलेकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा नाशिकमध्ये उत्साहात संपन्न; मान्यवरांच्या हस्ते 'मानपत्र' देऊन गौरव:

 दत्तात्रय बेलेकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा नाशिकमध्ये उत्साहात संपन्न;

 मान्यवरांच्या हस्ते 'मानपत्र' देऊन गौरव:


        -    दत्ताभाऊ बेलेकर हे सेवाभावी व्यक्तीमत्व-

             जेष्ठ पत्रकार विनोद बेदरकर यांचे या निमित्ताने गौरवौद्गार: 


​   वार्ता नाशिक-   प्रा.संजय फाकटकर


नाशिक येथील जिल्हा परिषद सेवेत असणारे कर्मचारी श्री.दत्तात्रय दगडूशेठ बेलेकर यांनी आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्य करून सेवानिवृत्तीचा टप्पा गाठला आहे. त्यांच्या या गौरवशाली प्रवासाचे औचित्य साधून नाशिकमध्ये एका भव्य सेवानिवृत्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

​मंगळवार, ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता नाशिक-पुणे रोडवरील 'नाशिक क्लब' येथील नंदिनी वुडलँड्स रेस्टॉरंटमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते श्री.बेलेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

​याप्रसंगी प्रांतिक मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार फाकटकर, उपाध्यक्ष रविंद्र खोल्लमकर, सचिव दिलीप घोडेकर, नाशिक संस्थेचे अध्यक्ष अरूण बेलेकर, ज्येष्ठ पत्रकार विनोद बेदरकर व खजिनदार डॉ.प्रशांत बेदरकर यांच्या हस्ते श्री.दत्तात्रय बेलेकर यांना सन्मानपूर्वक 'मानपत्र' प्रदान करून गौरविण्यात आले.​ कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी बेलेकर यांच्या ३५ वर्षांच्या निस्वार्थ सेवेचा गौरव केला. "एखाद्या संस्थेत निष्ठेने काम करून सेवानिवृत्त होणे, हा जीवनातील आनंदाचा क्षण असतो," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. ​या सोहळ्याला बेलेकर कुटुंबीय, मित्रपरिवार, त्यांचे कार्यालयीन सहकारी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- सेवानिवृत्त निमित्त मान्यवरांच्या प्रतिक्रिया:

     ●  जेष्ठ पत्रकार विनोद बेदरकर - 

दत्ताभाऊ बेलेकर यांचे कर्मचारी म्हणून  केलेले व सामाजिक कार्य बघता ते एक  समाजातील आदर्श व्यक्तीमत्व आहे.

   प्रांतिक अध्यक्ष नंदकुमार फाकटकर  - दत्ताभाऊ यांनी अखंड ३५ वर्ष कर्मचारी म्हणून सेवा केलीच पण एक आदर्श व उच्च शिक्षित कुटुंब घडविण्यात कोणतीच कसर ठेवली नाही.

डाॅ.प्रशांत बेदरकर ( खजिनदार दे.दै.सोनार समाज संस्था नाशिक)  -  दत्ताभाऊ हे नेहमी सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असणारे व्यक्तीमत्व आहे. 

● समाज सेविका - पोर्णिमा घोडेकर - दत्ताभाऊंच्या प्रदीर्घ सेवेत एक कुटुंब म्हणून पत्नी शामाली, मुलगा अक्षय, मुलगी अदिती सुन हर्षा व जावई प्रतिक यांनी मोलाची साथ दिली हे केवळ दत्ताभाऊंच्या कुटुंब वत्सल व प्रेमळस्वभावामुळे 

कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने झाला. बेलेकर कुटुंबाने आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विनी मांदळे यांनी केले.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समाज जनगणना – प्रगतीचे मोजमाप आणि संस्थात्मक सक्षमीकरणाचा ‘रोडमॅप’लेखक : प्रा. संजय फाकटकर (अभ्यासक, नाशिक)

​ठाणे जिल्ह्याचे श्रद्धास्थान: महामार्गावरील खर्डी गावच्या श्री सोनाई सीताई देवीचा यात्रात्सव: ( १४ एप्रिल ते अक्षय तृतीया १९  एप्रिल पर्यंत )