सुसंस्कारित समाज घडविण्यासाठी संस्काराबरोबरच नविन कायदेविषयक साक्षरतादेखिल महत्वाची: मा.हरिष खेडकर - उपविभागीय नाशिक ग्रामीण पोलीस अधिकारी
सुसंस्कारित समाज घडविण्यासाठी संस्काराबरोबरच नविन कायदेविषयक साक्षरतादेखिल महत्वाची:मा.हरिष खेडकर ( उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण ) कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात नविन कायदेविषयक साक्षरता अभियान आयोजन प्रसंगी प्रतिपादन: येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात गोवर्धने महाविद्यालय व नाशिक ग्रामीण पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदेविषयक साक्षरता जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी हरिष खेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण, इगतपुरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल तसरे, या साक्षरता अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक अॅड.सागर वालझाडे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष प्राचार्य डाॅ.किरण रकिबे उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाला संबोधित करताना उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांनी ज्या प्रमाणे महाविद्यालये विद्यार्थांना सुसंस्कारित करतात त्याच प्रमाणे देशात नवनवीन कायदे, त्यातील सुधारणा समाजाच्या निकोप वाढीसाठी सरकारकडून मंजूर केले जातात पण त्याची अंमलबजावणी या कायदे काय आहेत ? क...