शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील संवाद

सुसंस्कारित समाज घडविण्यासाठी संस्काराबरोबरच नविन कायदेविषयक साक्षरतादेखिल महत्वाची: मा.हरिष खेडकर - उपविभागीय नाशिक ग्रामीण पोलीस अधिकारी

इमेज
  सुसंस्कारित समाज घडविण्यासाठी संस्काराबरोबरच नविन कायदेविषयक साक्षरतादेखिल महत्वाची:मा.हरिष खेडकर ( उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण ) कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात नविन कायदेविषयक साक्षरता अभियान आयोजन प्रसंगी प्रतिपादन: येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात गोवर्धने महाविद्यालय व नाशिक ग्रामीण पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदेविषयक साक्षरता जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी हरिष खेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण, इगतपुरी वरिष्ठ पोलीस  निरीक्षक राहूल तसरे, या साक्षरता अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक अ‍ॅड.सागर वालझाडे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष प्राचार्य डाॅ.किरण रकिबे उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाला संबोधित करताना उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांनी ज्या प्रमाणे महाविद्यालये विद्यार्थांना सुसंस्कारित करतात त्याच प्रमाणे देशात नवनवीन कायदे, त्यातील सुधारणा समाजाच्या निकोप वाढीसाठी सरकारकडून मंजूर केले जातात पण त्याची अंमलबजावणी या कायदे काय आहेत ? क...

जीवनाचे मुल्य व आनंद घेण्यासाठी वाहतुकीचे नियम व आचारसंहिता पाळणे गरजेचे: श्रीमती पुनम दळवी R.T.O. Officer( प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक अधिकारी )  'रस्ते व आग सुरक्षा जनजागृती अभियान'  प्रसंगी प्रतिपादन: 


गोवर्धने महाविद्यालय आणि महामार्ग सुरक्षा पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालय, इगतपुरी व घोटी पोलीस स्टेशन, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनी इगतपुरी, इगतपुरी योगेश्वर ड्राव्हिंग स्कूल आयोजित:  

'रस्ते सुरक्षा व आग सुरक्षा जनजागृती अभियान 'उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.किरण रकिबे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती पुनम दळवी, लोहमार्ग  इगतपुरी पोलीस अधिकारी सुनिल आहिरे, इगतपुरी योगेश्वर ड्राव्हिंग स्कूलचे संचालक विजयजी कडलग, सुशांत कडलग, हरीश चौबे डेप्युटी फायर ऑफिसर व उपस्थित मान्यवर 

येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात 'रस्ता व आग सुरक्षा जनजागृती अभियान २०२५'  गोवर्धने महाविद्यालय आणि  महामार्ग सुरक्षा पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालय, इगतपुरी व घोटी पोलीस स्टेशन, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनी इगतपुरी, इगतपुरी योगेश्वर ड्राव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत महाविद्यालयीन विद्यार्थांना वाहतुकीचे नियम व वाहतूक नियंत्रण कायदा याबत माहिती देऊन वाढलेले अपघात कसे टाळता येतील याबत विविध अधिका-यांनी खालील मत मांडले:


  ● प्राचार्य डॉ.किरण रकिबे : 

गोवर्धने महाविद्यालय 'रस्ते सुरक्षा व आग सुरक्षा' याबाबत महाविद्यालय नेहमीच जागृत असून हे महाविद्यालय राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने विशेष काळजी घेऊन विद्यार्थांना याबाबत विविध उपक्रमांतर्गत प्रबोधन व मार्गदर्शन केले जाते.

  ● श्रीमती पुनम दळवी ( अधिकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक: 

नेहमीचे अपघात बघता आपण जीवनाचे मुल्य व आनंद घेण्यासाठी वाहतुकीचे नियम व आचारसंहिता पाळणे गरजेचे असून विद्यार्थींनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ऑनलाइन सेवेचा फायदा घेऊन सुरक्षित वाहने चालवावीत. 

  ● सुनिल आहिरे (  पोलीस अधिकारी घोटी- इगतपुरी महामार्ग ):

राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात हे वाहतुकीचे नियम न पाळणे,  निष्काळजीपणा, बेपर्वाईने वाहतूक करणे यातूनच होतात याबाबत शासनस्तरावर अनेक उपाययोजना  व उपक्रम राबविले जातात घोटी- इगतपुरी कसारा घाट महामार्गावर अपघात प्रसंगी अपघातग्रस्तांना तातडीने मदत अॅम्बुल्नस सुविधा मिळावी म्हणून 8888263030   या हेल्पलाईन नंबरचा व कैलास गतीर मो.न.9209473196 उपयोग करावा.

     या प्रसंगी इगतपुरी योगेश्वर ड्राव्हिंग स्कूलचे संचालक विजयजी कडलग, सुशांत कडलग, हरीश चौबे डेप्युटी फायर ऑफिसर, सुरेश वळकंदे, अमोल गुरव महिंद्रा अँड महिंद्रा अधिकारी, डाॅ.लता पाठक प्राचार्य पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, कैलास गतीर अॅम्बुल्नस चालक कसारा घाट यांनी या कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थीवर्ग व प्राध्यापक व सेवक वर्गाला मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे सन्मवयक प्रा.एस.एस.परदेशी व राकेश गायकवाड यांनी उत्कृष्ट नियोजन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उत्तम सांगळे यांनी केले उपक्रम यशस्वीतेसाठी दत्ता गायकवाड, अजय निकम, अमोल टिळे, भिम जेधे, आकाश जगताप, आकाश दिवटे, महेश उगले प्रयत्न  यांनी केले.



'रस्ते  व आग सुरक्षा जनजागृती अभियान' उपक्रम कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.एस.एस.परदेशी व राकेश गायकवाड यांना सन्मानित करताना प्राचार्य डॉ.किरण रकिबे व मान्यवर 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे प्रा.उत्तम सांगळे
 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुसंस्कारित समाज घडविण्यासाठी संस्काराबरोबरच नविन कायदेविषयक साक्षरतादेखिल महत्वाची: मा.हरिष खेडकर - उपविभागीय नाशिक ग्रामीण पोलीस अधिकारी