ठाणे जिल्ह्याचे श्रद्धास्थान: महामार्गावरील खर्डी गावच्या श्री सोनाई सीताई देवीचा यात्रात्सव: ( १४ एप्रिल ते अक्षय तृतीया १९ एप्रिल पर्यंत )
ठाणे जिल्ह्याचे श्रद्धास्थान: महामार्गावरील खर्डी गावच्या श्री सोनाई सीताई देवीचा अद्भूत( १४ एप्रिल ते अक्षय तृतीया १९ एप्रिल पर्यंत ) यात्रात्सव: संकलन - प्रा.संजय फाकटकर ठाणे जिल्ह्यातील मुंबई-नाशिक नॅशनल हायवेवर ( क्र.३ ) वसलेले खर्डी गाव सध्या भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. हजारो भाविकांची नितांत श्रद्धा असलेले आणि ऐतिहासिक वारसा जपणारे श्री सोनाई सीताई देवीचे मंदिर भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. रेल्वे स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटरवर हे मंदिर असून मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करताना खर्डी हे महत्त्वाचे ठिकाण लागते. खर्डी रेल्वे स्थानकापासून सुमारे दो किलोमीटर अंतरावर देवीचे हे भव्य मंदिर आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिरात दरवर्षी हजारो भक्त देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. शिरोळ ते खर्डी: देवीच्या आगमनाचा इतिहास: सुमारे १८५ वर्षांपूर्वी देवीचे मूळ स्थान शिरोळ येथील गोपाळपाड्यावर होते. खर्डी येथील भिका ...